निवडणूक वर्षात 16 हजार कोटींच्या ठेवी मोडून देणार सुविधा:‘मुंबई आय’ उभारणार, 74 हजार कोटींंचे अंदाजपत्रक; 14 हजार कोटींची वाढ
2 hours ago
1
बहन्मुंबई महापालिकेने २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी सादर केला. यात मुंबईतील पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, पर्यटन आणि प्रदूषण यावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात १४ हजार कोटींची वाढ झाली आहे. मालमत्ता कर, मलनिस्सारण आणि पाणीपट्टीत यंदा कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. मे २०२६ पर्यंत सर्व रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल. विविध वॉर्डांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या चार शाळा उघडण्यात येतील. यात नर्सरी ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी ११३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘लंडन आय’ च्या धर्तीवर सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. मुंबईमधील २ लाख ५० हजारांपैकी ५० हजार झोपडपट्टीमध्ये उद्योगधंदे सुरू आहेत. त्यांच्यावर मालमत्ता कर लावून झोपडपट्टीधारकांना सोयी सुविधा दिल्या जातील. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक मालमत्तांवर करामधून ३५० कोटी महसूल अपेक्षित आहे. मुंबईसाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्याचा विचार महापालिकेचा आहे. हा तर अदानी कर : आदित्य झाेपडपट्टीवरील कर हा अदानी कर असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. धारावीतून दुकाने व घरे खाली करण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. शिंदे सरकारने २ वर्षात काढले १८ हजार कोटी सध्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ८१ हजार ७७४ कोटी ठेवी आहेत. २०२३-२४ या वर्षात शिंदे सरकारच्या कार्यकाळात यापैकी ६३६४.४८ कोटी निधी काढण्यात आला होता. २०२४-२५ पर्यंत १२,११९ कोटी निधी काढण्यात आला. २०२५-२६ मध्ये १६ हजार ६९९ कोटी इतका निधी काढला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले. गेल्या पाच वर्षांचा अर्थसंकल्प 2020-2021 33 हजार कोटी
2021-2022 39 हजार कोटी
2022-2023 45,949 हजार कोटी
2023-2024 52,619 हजार कोटी
2024-2025 59,954 हजार कोटी
ठळक तरतुदी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)