निसर्गाच्या अवकृपेने उत्पादनात घट, 10 एकर द्राक्ष बागा तोडली:अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष बागायतदार कर्जबाजारी‎

2 hours ago 1
बदललेल्या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर सातत्याने फवारणी करावी लागतेय. त्यात बहर धरल्यानंतर पीक ऐणभरात आल्यानंतर अवकाळीने कधी-कधी बागच नेस्तनाबूत होते. त्यामुळे या नुकसानीला कंटाळून द्राक्ष बागा उत्पादकांनी १० एकर द्राक्ष बागा उखडून काढण्यास सुरुवात केली आहे. सद्य स्थितीत पापरी परिसरातील १० एकरहून अधिक बागा उखडून टाकल्या आहेत. काही द्राक्ष उत्पादक ऑक्टोबर छाटणी केली असून, त्या बागांवर अपेक्षित घड निर्मिती होते की नाही, हे पाहत आहेत. समाधानकारक घड नाही लागल्यास आणखी २० एकरावरच्या बागा काढण्याचा विचार आहे, असे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. गत पाच-सहा वर्षांत पापरी परिसरात द्राक्षबागा लागवडीचे प्रमाण वाढले. शंभर एकरहून अधिक क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात होणारा बदल, दिवसातून दोन-तीन वेळा करावी लागणारी महागड्या औषधांची फवारणी, वाढती मजुरी, तसेच रासायनिक खतांच्या तसेच ठिबकमधून सोडण्यात येणारी विद्राव्य खते यांच्या वाढलेल्या किमती, या सर्व संकटावर मात करत लाखो रुपये गुंतवत द्राक्ष माल विक्रीस तयार करून त्यास बाजारपेठेत विक्रीस पाठवल्यावर मिळणारा दर पाहता द्राक्ष उत्पादकांच्या हाती खर्च वजा जाता तोकडीच किंमत राहते, तर कधी कधी कांही हंगामात केलेला खर्च ही निघत नाही उलट त्यात हजारो रुपयांची पदरमोड करून गत हंगामातील औषध दुकानदार, खत विक्रेते यांचे पैसे त्यांना द्यावे लागतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादक कर्जबाजारी झाले. त्यामुळे काही जण द्राक्ष बागा काढून टाकत आहेत. शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागा तोडून टाकत आहेत. काही सजग द्राक्ष उत्पादकांनी गत वर्षीच आपल्या बागा उखडून त्याच्या लोखंडी अँगल व तारेच्या फाउंडेशन वर काकडी, दोडका,भोपळा अशी कमी पाण्यात, कमी वेळेत कमी खर्चात निघणारी वेलवर्गीय पिके घेत लाखो रुपयांची कमाई केलेली इतर द्राक्ष उत्पादक पाहत असल्याने त्यांचीही मनस्थिती आता द्राक्षबागेत वर्षभर राबून,सतत महागड्या फवारण्या करत तोट्यात जात बसण्यापेक्षा आपणही वेलवर्गीय पिके घेत द्राक्ष बागेसाठी झालेले आर्थिक नुकसान अल्पावधीत भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून शेती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पदरमोड करून बाग सांभाळली तरी तोटाच... आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टीने दोन एकर द्राक्ष बाग लागवड केली होती. तीन-चार हंगाम घेतले. सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करत मालही विक्रीयोग्य आणला. मात्र कधी बाजारपेठेत अपेक्षित दर, तर कधी घड जिरल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. काही हंगामात तर हजारो रुपयांची पदरमोड करत औषध दुकानदाराचे पैसे दिले. आता आर्थिक संकट येऊ लागल्याने या आठवड्यात द्राक्ष बाग काढून टाकली. त्या लोखंडी फाउंडेशनवर वेलवर्गीय पीक घेणार आहे. -सज्जन भोसले, द्राक्ष उत्पादक, पापरी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article