नेत्रसेवेच्या क्षेत्रात अधिक उल्लेखनीय कार्य उभे राहवे:उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केली अपेक्षा

2 hours ago 1
चित्रकूटमध्ये सद्गुरु नेत्र रुग्णालयातर्फे मोतिबिंदू आणि डोळ्यांचा तिरळेपणा निर्मूलन क्षेत्रात सुरु असलेले काम प्रेरणादायी असून महाराष्ट्रात देखील चित्रकूट प्रमाणे नेत्रसेवेच्या क्षेत्रात अधिक उल्लेखनीय कार्य उभे राहवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केली. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या "पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कारांचे" वितरण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी फिरोदिया बोलत होते . न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात यंदाचा संस्थात्मक पातळीवरील पुरस्कार मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील सद्गुरु नेत्र रुग्णालयास, तर वैयक्तीक पातळीवरील पुरस्कार कोलकाता येथील असोसिएशन ऑफ कम्युनिटी ॲप्थॉलमोलॉजिस्टस् ऑफ इंडिया अर्थात अकॉईनचे संस्थापक प्रा. डॉ. स्वपन सामंथा यांना प्रदान करण्यात आला.यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. मध्य प्रदेशातील चित्रकुट येथील सद्गुरु नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक आणि विश्वस्त बी. के. जैन यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्विकारला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, चेअरमन डॉ. सतीश देसाई, सचिव डॉ. राजेश पवार , हास्य क्लबचे संस्थापक विठ्ठल काटे आणि कोषाध्यक्ष डॉ. संपत पुंगलीया उपस्थित होते.मध्य प्रदेशातील चित्रकुट येथील सद्गुरु नेत्र रुग्णालयातर्फे बी . के .जैन यांनी तर वैयक्तीक पातळीवरील पुरस्कार कोलकाता येथील असोसिएशन ऑफ कम्युनिटी ॲप्थॉलमोलॉजिस्टस् ऑफ इंडिया अर्थात अकॉईनचे संस्थापक प्रा. डॉ. स्वपन सामंथा यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. स्वपन सामंथा यांनी पुरस्काराची रक्कम रूपये एक लाख हे महिला सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याचे घोषित केले. फिरोदिया म्हणाले की, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानने नेत्रसेवा क्षेत्रात सध्या करत असलेल्या कामाची व्याप्ती वाढविल्यास आणि पुढाकार घेतल्यास आम्ही सर्वार्थाने पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहू. उद्योजक फिरोदिया यांनी अकॉईनचे संस्थापक प्रा. डॉ. स्वपन सामंथा यांना त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणून एक चारचाकी वाहन देण्याचे जाहीर केले. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, दृष्टी हा अमूल्य ठेवा असून केवळ दृष्टी नसल्याने क्षमता असूनही व्यक्तिला अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि आजच्या पुरस्कारार्थींचे या क्षेत्रातील कार्य मोलाचे ठरते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article