Published on
:
05 Feb 2025, 6:00 am
Updated on
:
05 Feb 2025, 6:00 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - नोरा फतेही आणि जेसन डेरुलो या जोडीन अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नोराचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरले आहे आता त्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडलीय. नवीन म्युझिक व्हिडिओ स्नेक टॉप ५ सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत सामील झाला आहे.
नोरा फतेही तिच्या डान्स मूव्हसाठी खूप प्रसिद्ध आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्याचे अमेरिकन गायक जेसन डेरुलोसोबतचे स्नेक हे नवीन गाणे रिलीज झाले. या गाण्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. 'स्नेक' हे अवघ्या २४ तासात सर्वाधिक पाहिले गेलेले दुसरे गाणे ठरले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांच्या नवीन म्युझिक व्हिडिओ 'स्नेक'ने २४ तासांत जगभरात सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंमध्ये टॉप २ क्रमांक मिळवला आहे. या गाण्याला ८० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
नोराने एका मीडिया मुलाखतीत सांगितले, 'हे माझ्यासाठी पूर्णपणे अविश्वसनीय आहे. 'स्नेक' जागतिक स्तरावर टॉप २ मध्ये पोहोचणे हा माझ्यासाठी आणि टीमसाठी खास क्षण आहे. ब्रुनो मार्स आणि रोसे सारख्या कलाकारांसोबत तिथे असणे हा सन्मान आहे. हे दर्शविते की लोक खरोखरच माझ्या आंतरराष्ट्रीय संगीतातील कामगिरीचा स्वीकार करत आहेत. याचा अर्थ माझ्यासाठी सर्वकाही आहे. या गाण्यात मी स्वतःला खूप सामावून घेतले आहे. त्यामुळे जगभरातील लोक त्याच्याशी जोडले जात आहेत. खरंच अविश्वसनीय'.