पंढरपूरजवळील पालखी मार्गावर कार नाल्यात काेसळून चार ठार:सहा जखमी, मृत फलटणचे रहिवासी, तुळजापूरला दर्शनासाठी निघाले होते

2 hours ago 1
बडनेराकडून अमरावतीकडे येणाऱ्या कारला समाेरून येणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. १६) मध्यरात्री २ वाजता अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील वडुरा गावाजवळ झाला. तिन्ही तरुण हे मित्र होते. ऋषिकेश ज्ञानेश्वर कराळे (२८, अर्जुननगर), अजय रामखिलावन यादव (३२, रा. अर्जुननगर, ह. मु. मध्य प्रदेश) आणि रजत गंगाधर मेश्राम (३२, रा. माहुली जहागीर) अशी मृतांची नावे आहेत. सुमीत लक्ष्मणराव गाटुरवार (३०, रा. अशोक कॉलनी, अमरावती) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ते काही कामानिमित्त कारने बडनेरा परिसरात गेले होते. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास ते बडनेराहून एक्स्प्रेस हायवेने अर्जुननगरकडे परत येत होते. या वेळी मार्गावरील वडुरा फाट्याजवळ या तरुणांची कार अनियंत्रित झाली. याच वेळी अमरावतीकडून बडनेराकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या कारला चिरडले. त्यामध्ये कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या धडकेत कारचा चुराडा झाला. कारमध्ये अडकलेल्या तरुणांना पोलिस व उपस्थितांना कारचे काही भाग तोडून बाहेर काढावे लागले. या चौघांनाही तातडीने इर्विन रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून त्रषिकेश, अजय, रजत यांना मृत घोषित केले, तर सुमीतवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. बडनेराकडून अमरावतीकडे येत होते तरुण, एक जण गंभीर जखमी पुणे ते मोहोळ या पालखी महामार्गाच्या बायपास रोडवर कौठाळी (ता. पंढरपूर) हद्दीत कार रस्त्याखाली जात नाल्यात काेसळल्याने कारचा चक्काचूर हाऊन एकाच कुटुंबातील चाैघांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात मृत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात चालक सुदाम तानाजी नलावडे आणि एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कनेटकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर या चौघांचा मृत्यू झाला, तर वर्षा एकनाथ निंबाळकर, मंगल नामदेव निंबाळकर, अमृता एकनाथ निंबाळकर, समृद्धी एकनाथ निबाळकर, अदिती एकनाथ निंबाळकर, आशुतोष सचिन निकम (रा. सर्व पवारवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. एकनाथ दत्तू निंबाळकर (रा. पवारवाडी, ता. फलटण, जिल्हा सातारा) हे त्यांच्या कुटुंबातील लोकांसह तुळजापूरला निघाले होते. वाखरीजवळ आल्यानंतर पालखी महामार्ग बायपासने जात असताना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शिराढोण - कौठाळी येथील पंचगंगा स्टॉपजवळ आल्यानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन नाल्यात पडली. यात चाैघांचाही जागीच मृत्यू झाला. महामार्गाचे काम अपूर्ण वाखरी ते घाडगे वस्ती (देगाव) दरम्यान सुमारे १४ किमी लांबीच्या बायपास पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. सुरक्षाविषयक तरतुदींची अद्याप पूर्तता झालेली नाही. गतिरोधक झालेले नाहीत. चौक, उड्डाण पुलाजवळ अद्याप पथदिवे सुरू झालेले नाहीत. दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नवीन वाहनचालकांची दिशाभूल होते. रस्त्यावरील डांबरीकरणाचा कार्पेट थर निघून गेल्याने रस्ता खडबडीत झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article