पटेल-तटकरेंच्या विनंतीनंतर NCP च्या अधिवेशनाला आलो:नाराजी दूर होण्याचा मुद्दाच नसल्याचा छगन भुजबळांचा दावा; अजित पवारांशी चर्चा झाली नसल्याचेही केले स्पष्ट
2 hours ago
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर हे कोणत्याही एका व्यक्तीचे शिबिर नाही. तर ते पक्षाचे शिबिर आहे. त्यामुळे नाराजी दूर झाली हा मुद्दाच येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनाला येण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी अधिवेशनाला आलो असल्याचे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांनी कोणत्याच प्रकारचा संपर्क साधलेला नसल्याचे देखील भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे शिर्डी मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकाकडे लागले होते. आपल्याला प्रफुल्ल पटेल येऊन भेटले तसेच त्यांनी दोन तास आपल्याशी अधिवेशनाला येण्याच्या संदर्भात चर्चा केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आपल्याला फोन करून थोड्या कालावधीसाठी तरी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण अधिवेशनाला आलो असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. मात्र अधिवेशनाला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असा अर्थ होत नाही, असे देखील भुजबळ यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी फोन केला होता का? असा प्रश्न देखील पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला होता. मात्र छगन भुजबळ यांनी 'नाही' या एकाच शब्दात या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अशी चर्चा झाल्याचे वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ आणि अजित पवार या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकमेकांच्या समोरासमोर येत आहेत. पोस्टर मध्ये पवार, पटेल, तटकरे नंतर भुजबळ यांचा मोठा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अधिवेशनात त्यांना मानाचे स्थान दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बॅकग्राउंडवर असलेल्या पोस्टर मध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नंतर छगन भुजबळ यांचा मोठा फोटो वापरण्यात आला आहे. त्या माध्यमातून भुजबळ हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न पक्षाने केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी आता पक्ष काय निर्णय घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा... राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये आजपासून राज्यस्तरीय अधिवेशन:धनंजय मुंडे, छगन भुजबळांच्या उपस्थितीकडे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारगटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिर्डी येथे 18 व 19 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पक्षाचे राज्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थिती लावणार आहेत. सध्या वादात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे आणि नाराज असलेले छगन भुजबळ हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले भुजबळ आणि अजित पवार यांची या निमित्ताने पहिल्यांदाच भेट होणार आहे. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
पटेल-तटकरेंच्या विनंतीनंतर NCP च्या अधिवेशनाला आलो:नाराजी दूर होण्याचा मुद्दाच नसल्याचा छगन भुजबळांचा दावा; अजित पवारांशी चर्चा झाली नसल्याचेही केले स्पष्ट