पद मागायला पुढे; कामाला मागे, हे चालणार नाही

3 hours ago 2

राष्ट्रवादी पदाधिकारी निवड बैठकीत मार्गदर्शन करताना खा. नितीन पाटील.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 12:00 am

Updated on

31 Jan 2025, 12:00 am

सातारा : राष्ट्रवादी पक्ष वाढवताना युतीमधील तिन्ही पक्षांचा मेळ घालणे गरजेचे आहे. पक्षामध्ये पद मागायला पुढे येणारे व वेळप्रसंगी भांडणारे पक्षवाढीच्या कामात मागे राहतात, हा पूर्व इतिहास पाहता पद मागायला पुढे अन् कामाला मागे, असे आता चालणार नाही, अशी तंबी खा. नितीन पाटील यांनी पदाधिकार्‍यांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादी कार्यालयात पार पडला, याप्रसंगी खा. पाटील बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळसाहेब सोळस्कर, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, राष्ट्रवादी प्रदेश सेलचे अध्यक्ष राजेंद्र लवंगारे, महिला आघाडीच्या नेत्या सीमा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, मंगेश धुमाळ, कोरेगावचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडीक, निवास शिंदे यांची उपस्थिती होती.

खा. नितीन पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत तर आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीचे आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार प्रचंड मोठ्या फरकाने विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन पक्षांचा मेळ घालत आपल्याला पक्षवाढीसाठी काम करावे लागणार आहे. आगामी काळात गावोगावी मांडव टाकून पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम करणार आहोत. जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवणार आहे.

सर्वांनी मिळून पक्षसंघटना वाढीचे काम करायचे आहे. पक्ष सभासद नोंदणीचे काम वेगाने करायचे आहे. ज्यांना खरंच चांगले काम करायचे आहे, त्यांच्यावर तालुका कार्यकारिणींची जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी यादी तयार करण्यात यावी. 8 फेब्रुवारीपासून सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरु होईल, असेही खा. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, फलटण तालुक्यातील रामभाऊ ढेकळे, नंदकुमार नाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कट्टर आहे हे सांगायची गरज आहे का? : आ. सचिन पाटील

पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात आ. सचिन पाटील आणि बाळासाहेब सोळस्कर यांची शाब्दिक जुगलबंदी पहायला मिळाली. सोळस्कर म्हणाले, ‘काही लोक संभ्रम निर्माण करतात, त्यामुळे फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात पक्षवाढीच्या कामासाठी फिरावे,’ त्यावर आ. सचिन पाटील म्हणाले, ‘कट्टर आहे ते सांगण्याची गरज आहे का? कट्टर जे नाहीत त्यांना ते सांगा.’ या शाब्दिक जुगलबंदीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article