पराभवाने खचून न जाता जास्त जोमाने काम करणार:श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या आभार सभेमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना मत विभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने व जोमाने काम करण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या काँग्रेस भवन येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात महायुतीच्या वतीने विचारविनिमय करण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अरुण नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, कैलास बोर्डे, अजित कदम, अमृत धुमाळ, शरद नवले, बाळासाहेब तोरणे, शिवाजी गांगुर्डे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शहा, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, बाबासाहेब खोसरे, सलीम शेख, अर्चना पानसरे, अनिता ढोकणे, वेणुनाथ कोतकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. काहींनी महायुतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत सर्वांनी कष्ट घेतले. आगामी निवडणुकीतही एकत्रपणे काम करून पराभवाचा वचपा काढू, असे यावेळी अरुण नाईक यांनी सांगितले. आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरसाठी ३ हजार कोटी रुपये निधी देण्याचे शब्द दिला. आगामी काळात तो निधी आणून विकासकामे करू, नवीन आमदाराने मागणी केल्यास त्यांनाही मदत करू. पराभवाने खचून न जाता संघटना वाढीसाठी प्रयत्न करू, असे अविनाश आदिक यावेळी म्हणाले. अशोक कानडे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आले ही आपली जमेची बाजू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नासाठी हतबल होण्याचे कारण नाही. सहकाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या सुख-दुःखात, त्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, शेवटच्या दोन दिवसात वातावरण बिघडून आत्मघात झाला. असे असले तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. आगामी काळात पक्ष संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे आवाहन अजित कदम यांनी केले. ॲड. संदीप चोरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अविनाश आदिकाना विधानपरिषदेवर घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे यांनी यावेळी अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article