पाणी योजनेचे काम पुलांमुळे लांबणार; आता डिसेंबरऐवजी डेडलाइन एप्रिलची:महामार्ग प्राधिकरणाने जलवाहिनी टाकण्याचे काम रोखले

5 hours ago 1
शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुलांच्या उभारणीसाठी रोखले आहे. त्यामुळे या कामाबद्दल नेत्यांनी दिलेली आश्वासने आणि न्यायालयात कंत्राटदाराने सादर केलेले कामाचे नियोजन कोलमडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी योजनेच्या कामाचा डिसेंबरचा मुहूर्त मार्च-एप्रिलपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. सध्या पैठण रस्त्यावर चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कामात काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांवर पूल उभारावे लागणार आहेत. पुलांचे अलाइनमेंट ठरल्याशिवाय तेथे मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करता येणार नाही. हे अंतर सुमारे चार ते पाच किलोमीटर आहे. अलाइनमेंट ठरवून पुलांचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे कामदेखील लांबू शकते. पुलांच्या कामामुळे अडचण पाणी योजनेचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण करून शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्याचे निर्देश यापूर्वी प्रशासकीय स्तरावरून दिले होते. परंतु, पुलांच्या कामांमुळे डिसेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्चपर्यंत काम पूर्ण करून शहराला वाढीव पाणी देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दोन दिवसांपूर्वी घेतला. या बैठकीतदेखील रस्त्याच्या कामामुळे पाणी योजनेच्या कामाला विलंब लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांनी सांगितले. ९०० मिमीच्या जलवाहिनीवर शहरातील पाणीपुरवठ्याची भिस्त नव्या पाणी योजनेच्या कामाची गती लक्षात घेता, अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९३ कोटी रुपये देऊन जायकवाडी ते फारोळा नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले. ऑगस्टपर्यंत वाढीव जलशुद्धीकरणाचे काम करणे अपेक्षित होते. या कामाला गती दिल्यास येणाऱ्या उन्हाळ्यात शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. या कारणांमुळे आतापर्यंत झाला उशीर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article