पाण्याअभावी बसस्टँडमधील स्वच्छतागृह बंद:अंजनगाव सुर्जी येथील चार दिवसांपासून बोअरवेल बंद; महिलांची होतेय कुचंबणा
6 days ago
2
येथील बसस्टँडच्या नूतनीकरणाचे काम ३२ वर्षानंतर सुरू झाले आहे. दर्यापूर आगारांतर्गत येथील बसस्टँडचे व्यवस्थापन चालते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चार दिवसांपासून येथे प्रवाशांच्या सोई सुविधांचे हाल होत आहेत. पाण्याची व्यवस्था असलेल्या बोअरवेलमधील मशीन नादुरुस्त झाल्याने पिण्याचे पाणी तर नाहीच सोबतच स्वच्छतागृह पाणी नसल्याने बंद पडले. त्यामुळे बसस्टँडमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल होताहेत. अंजनगावच्या बसस्टँडकडे दुर्लक्ष होतेय असा आरोप प्रवाशांकडून होत असून, खिळखिळ्या बसगाड्यांचा वापर होत असल्याने गाड्या रस्त्यात ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय प्रवाशांच्या सुविधेकडेही दुर्लक्ष होत आहे. गेल्या चार दिवसांपासून बसस्टँडमधील बोअरवेल मशीन जळाल्याने बंद पडली आहे. परिणामी पुरुष व महिलांचे स्वच्छतागृह पाण्याअभावी बंद करावे लागले. त्यामुळे प्रवाशांना विशेषत: महिला प्रवाशांना कुचंबणा सहन करावी लागत आहे. सध्या बसस्टँडच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून, याच बोअरवेलच्या पाण्याचा वापर बांधकामात होत आहे. मोटर बंद पडली तेव्हा कंत्राटदाराने या बोअरवेलमध्ये आपल्या कामापुरती पाण्याची व्यवस्था केली. परंतु स्वच्छतागृहांच्या टाक्यात पाणी जाईल, अशी व्यवस्था केली नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई न करता थेट स्वच्छतागृहांना कुलूप लावले. त्यामुळे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मशीन जळाली, पाइपही तुटला; लवकरच दुरुस्त ^बोअरवेलमधील मशीन जळाल्याने ती दुरुस्तीसाठी बाहेर काढताना पाइप तुटून खाली गाळात पडली. त्यामुळे आता ती बाहेर काढून दुरुस्त करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सांगितले आहे. -अभिष बहुळकर, आगार व्यवस्थापक, दर्यापूर.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)