Published on
:
15 Nov 2024, 6:27 am
Updated on
:
15 Nov 2024, 6:27 am
पालघर : बोईसर येथील खैरापाडा कृष्णनगर परिसरात काही व्यक्ती कॅनबीस वनस्पती पासून तयार केलेला काळा गडद रंगाचा गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या ठिकाणी सापळा रचून केलेल्या कारवाईत एक किलो ६६५ ग्रॅम वजनाचा कॅनविस वनस्पती पासून तयार केलेला उग्र दर्प असलेला काळपट रंगाचा गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. पुन्हा एकदा बोईसर परिसरात अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील व त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी दीपक राऊत नरेंद्र पाटील अंकुश केंगार बोईसर शहरांमध्ये पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खैरापाडा कृष्णनगर परिसरात शास्त्री क्लिनिक समोर आले असता, रोडच्या बाजूला सफेद रंगाची फोर्ड कंपनीची इंडिव्हेर गाडी एम एच ४६ पी ४१४१ त्या गाडीची झाडाझडती घेतली असता मोटार कारच्या मागील सीट खाली प्लास्टिक पिशवीत कॅनविस वनस्पती पासून तयार केलेला उग्र दर्प असलेला काळपट गळत रंगाच्या गांजा अमली पदार्थ मिळून आल्याने आरोपी लेसर देविस लोन आप्पा वय ४२ राहणार कडेश्वरी देवी मंदिर मार्ग सेंट फ्रान्सिस ऑफ आरसीसी चर्च जवळ चांदी वाला कंपनीचा बांद्रा पश्चिम याला ताब्यात घेतले.
खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला
सोळा हजार रुपये किमतीचा एक किलो ६६५ ग्रॅम वजनाचा कॅनविस वनस्पती पासून तयार केलेला उग्र दर्प असलेला काळपट गडद रंगाचा गांजा हा अमली पदार्थ.
पंधरा हजार रुपये रोख रक्कम पाचशे रुपयांच्या तीन नोटा
चार लाख रुपये किमतीची सफेद रंगाची फोड इंडोवर मोटर कार क्रमांक एम एच ४६ पी ४१४१. गाडीची किंमत चार लाख १७ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल.