पुढच्या आठवड्यात 6 नवे IPO येणार, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या

2 hours ago 1

तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का की, पुढील आठवड्यात नवे 6 IPO येणार आहेत. पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. सर्व सहा IPO SME सेक्शनमधील आहेत आणि राजेश पॉवर सर्व्हिसेस दलाल स्ट्रीटवर येणारा पहिला IPO आहे. जाणून घ्या.

पहिला IPO कोणता?

पुढील आठवड्यात नवे 6 IPO येणार आहेत. सर्व सहा IPO SME विभागातील आहेत आणि राजेश पॉवर सर्व्हिसेस दलाल स्ट्रीटवर येणारा पहिला IPO आहे. याविषयी विस्ताराने माहिती जाणून घ्या.

Rajesh Power IPO

विक्री कधी सुरु होणार – 25 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 27 नोव्हेंबरला बंद होणार किंमत – 319 ते 335 रुपये प्रति शेअर

हे सुद्धा वाचा

पुढील आठवड्यात उघडणारे सर्व सहा IPO SME सेगमेंटमधील आहेत आणि राजेश पॉवर सर्व्हिसेस दलाल स्ट्रीटवर येणारा पहिला IPO आहे. वीज क्षेत्रातील नवीकरणीय आणि अपारंपरिक अशा दोन्ही विभागांना सल्लागार सेवा पुरविणाऱ्या कंपनीची 160.5 कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री 25 नोव्हेंबरपासून 319 ते 335 रुपये प्रति शेअरच्या प्राईस बँडसह सब्सक्रिप्शनसाठी खुली होईल. ती 27 नोव्हेंबरला बंद होणार आहे.

Rajputana Biodiesel IPO

विक्री कधी सुरु होणार – 26 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 28 नोव्हेंबरला बंद होणार किंमत- 125 रुपयांवरून 123 रुपये प्रति शेअर

जैव इंधन आणि द्विप्रकल्प (ग्लिसरीन आणि फॅटी अ‍ॅसिड) बनवणाऱ्या जयपूरच्या कंपनीचा 24.7 कोटी रुपयांचा IPO 26 नोव्हेंबर रोजी खुला होईल आणि 28 नोव्हेंबरला बंद होईल. या ऑफरसाठी प्राईस बँड 123 ते 130 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने कमी किमतीचा रेशो 125 रुपयांवरून 123 रुपये प्रति शेअर केला आहे.

Apex Ecotech IPO

विक्री कधी सुरु होणार – 27 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 29 नोव्हेंबरला बंद होणार किंमत- 71 ते 73 रुपये प्रति शेअर

वॉटर अँड वेस्टवॉटर ट्रीटमेंट सोल्युशन्स प्रोव्हायडरने सुरुवातीच्या शेअर सेलद्वारे 25.54 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे, ज्याचे सब्सक्रिप्शन 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 29 नोव्हेंबरला संपेल. बुक बिल्ट इश्यूची किंमत 71 ते 73 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

Abha Power and Steel IPO

विक्री कधी सुरु होणार – 27 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 29 नोव्हेंबरला बंद होणार किंमत- 75 रुपये प्रति शेअर

लोह आणि पोलाद उत्पादने बनवणाऱ्या आभा पॉवर या कंपनीचा IPO 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान खुला होणार आहे. हा फिक्स्ड प्राइस इश्यू आहे, ज्याची ऑफर प्राईस 75 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

Agarwal Toughened Glass India IPO

विक्री कधी सुरु होणार – 28 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 2 डिसेंबरला बंद होणार किंमत- 105 ते 108 रुपये प्रति शेअर

अग्रवाल ग्लास इंडियाचा 62.6 कोटी रुपयांचा IPO 28 नोव्हेंबर रोजी लाँच होणार असून, त्याची किंमत 105 ते 108 रुपये प्रति शेअर असेल. टेम्पर्ड ग्लास मेकरचा इश्यू 2 डिसेंबरला बंद होणार आहे.

Ganesh Infraworld IPO

विक्री कधी सुरु होणार – 29 नोव्हेंबरपासून बंद कधी होणार- 3 डिसेंबरला बंद होणार

गणेश इन्फ्रावर्ल्ड हा चालू महिन्यात SME सेगमेंटमधून लाँच होणारा शेवटचा IPO असेल. बांधकाम कंपनीचा 98.6 कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू 29 नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि 3 डिसेंबरला बंद होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article