पुष्प आठवे:देहबोलीतून आत्मविश्वास संवाद साधतो,‎अन् योगा देतो आदर्श देहबोली- डॉ. चर्जन‎

2 hours ago 1
शरीराच्या बसण्या-उठण्याच्या सवयी शरीरावर परिणाम‎करतात. शरीर आणि मन एकमेकांशी सूक्ष्मपणे जोडले‎गेलेले आहेत. झुकलेले खांदे आत्मविश्वासाची‎कमतरता दाखवतात, तर सरळ बांधा आणि‎हालचालींतील ऊर्जा सकारात्मकता आणि‎आत्मविश्वास प्रदर्शित करतात, असे जनकल्याण‎समिती योग केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विवेक चर्जन यांनी‎सांगितले. याेग विद्याधाम प्रतिष्ठान आणि परमराज‎फाउंडेशनच्या वतीने ‘मान, पाठ, कंबरेचे दुखणे आणि‎त्यावरील योगोपचार’ या विषयावर आयोजित‎व्याख्यानात डॉ. चर्जन बोलत होते. व्याख्यानमालेचे हे‎आठवे पुष्प आहे. योग चळवळ आणि योगाचे विविध‎पैलू रुजवण्यासाठी या व्याख्यानांचे आयोजन केले जाते, ‎‎असे उमेश दरक यांनी सांगितले.‎ डॉ. चर्जन म्हणाले, देहबोलीबद्दल जागरुकता‎नसल्याने अनेकजण चुकीच्या सवयी लावून घेतात. नंतर‎या सवयी शरीरात कायमस्वरुपी बदल घडवून आणतात. ‎‎अन, त्यातून आजारांना निमंत्रण मिळते. आयंग्गर‎योगामध्ये विविध साधनांच्या माध्यमांतून योग करवून‎घेतले जातात. त्यामुळे शरीरातील स्नायुंमध्ये लवचिकता ‎‎वाढवण्यासोबतच बळकटीही मिळते.‎ चिरतारुण्य देणारा योग‎ योगसाधना शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक‎आरोग्यही निरायम करते. ध्यानधारणेतून स्वत:चा‎शोध घेणारा हा साधना प्रकार आहे.‎मानसिक-भावनिक स्थिरता असेल तर तारुण्य‎टिकून राहते. वयाप्रमाणे प्रत्येक जण वृद्ध होणार‎आहे. मात्र, योगसाधनेमुळे ऊर्जा टिकून राहते.‎ झुकलेले खांदे‎ आसनांनी करू ‎शकता सरळ‎‎ ‎ झुकलेले खांदे सरळ‎करण्यासाठी पश्चिम बद्ध‎हस्तासन, धनुरासन‎उपयुक्त ठरते. याचे‎सादरीकरण डॉ. चर्जन यांनी‎दाखवले. देहबोलीचा‎परिणाम मानसिकतेवर‎होतो. अन् त्याचा परिणाम‎आपल्या आयुष्यावर होतो.‎त्यामुळे देहबोलीविषयीची‎जागरुकता खूप महत्त्वाची‎असल्याकडे त्यांनी लक्ष‎वेधले. सुहास वखारकर‎यांनी आभार मानले.‎प्रार्थनेने कार्यक्रमाची‎सांगता झाली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article