पोलिस असल्याचे सांगून व्यापार्‍याला लुटले:तीन आरोपिंना बेड्या, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

2 hours ago 1
पोलिस असल्याचे सांगून टोळक्याने भंगार खरेदी विक्री करणार्‍या व्यवसायिकाला पिस्टलच्या धाकाने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामिण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. संतोष लक्ष्मण भंडलकर (वय ४२, रा. पणदरे, बारामती), सुरेश अशोक राखपसरे (वय ३३, रा कुंजीर वस्ती, मांजर, हवेली), शेखर सुभाष शिंदे (रा. सांगवी, ता. बारामती ) यांना अटक केली असून सुरज शंकर मदने (रा. माळेगाव, बारामती), हरीभाउ बबन खुडे, अशोक गणपती बनसोड (दोघेही रा. मांजरी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करुन शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी कुतुबुद्दीन सुभेदार शहा (वय ४०, रा. तांदुळवाडी, बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.ही घटना २३ सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील लोखंडे वस्ती वंजारवाडी येथे घडली. तक्रारदार शहा यांचे बारामती तालुक्यातील लोखंडे वस्ती वंजारवाडी येथे भंगार खरेदी विक्रीचे दुकान आहे. तक्रारदार दुकानात बसले असतांना भंडलकर आणि त्याचे साथिदार हे एक नंबर प्लेट नसलेली पांढर्‍या रंगाची कार घेउन तेथे आले. यावेळी त्यांनी तक्रारदार यांना कार विक्री करायचे असल्याचे सांगितले. मात्र कारला नंबर नसल्याने तक्रारदार शहा यांनी कार खरेदीला नकार दिला. यानंतर आरोपींनी तक्रारदार यांना पोलिस असल्याचे सांगून कार मध्ये बसवून त्याच्या जवळील मोबाईल व आठ हजारांची रोख रक्कम काढून घेतली. तसेच तु चोरीचा माल खरेदी करतो, आम्हाला १५ लाख दे नाही तर तुला भिगवन पोलिस ठाण्यात घेवून जातो असे सांगितले. यानंतर तक्रारदार यांनी आरडाओरड केली असता एका आरोपीने पिस्टल काढून ओरडून नको म्हणत दौंड नगर रस्त्यावरील चिखली गावाजवळील पेट्रोल पंपावर सोडून दिले. यांनतर तक्रारदार यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तीन पथके स्थापन करुन आरोपिंचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी गुन्हा वापरण्यात आलेल्या कार सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसून आली. गुन्हात वापरण्यात आलेली कार ही आरोपी संतोष भंडलकर याची असून तो सोलापूर एका सराफा व्यावसायिकाला लुटण्यासाठी जात असल्याचे असल्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत समजले होते. यानंतर संतोषला सोलापूर हायवे जवळ हिंगणगाव परिसरात सापळा रचुन अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून त्यांच्यावर १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देखमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, एसडीपीओ, सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article