प्रियंका गांधी यांच्या ‘रोड शो’त घुसून नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा:दोन्ही गटांची घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीमार, संघ मुख्यालय परिसरात तणाव
1 hour ago
1
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी नागपूरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे दोन रोड शो आयोजित केले होते. त्यापैकी एक रॅली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल ते बडकस भागापर्यंत होती. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे झेंडे घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने -सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र “भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते, पण जिंकणार तर महाविकास आघाडीच,’ असे म्हणत प्रियंका यांनी आणखी चिथावले. त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी वाढली. तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करून गदारोळ करणाऱ्यांना बाहेर काढले. प्रियंका गांधींनी प्रथमच नागपूरकरांशी संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया व राहुल गांधी नागपुरात प्रचारासाठी आले होते. मात्र, प्रियंका यांचा हा पहिलाच दौरा होता. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील त्यांचा राेड शो उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. मध्य नागपूर मतदारसंघात मात्र भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याने त्यास गालबोट लागले.
राजकारण्यांची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर आज प्रचाराचा अखेरचा दिवस. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच भाेंगे, सभा, रॅली घेऊन प्रचार करता येईल. संविधान, महागाई, आरक्षण या मुद्द्यांवरून सुरू झालेली ही राजकीय लढाई शेवटच्या टप्प्यात गुद्द्यावर येऊन घसरलीय. नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला, तर अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जमावाने तोडफोड केली. एकीकडे लाडक्या बहिणींच्या काळजीची भाषा अन् दुसरीकडे महिला नेत्यांना टार्गेट करणे कोणत्या संस्कृतीत बसते? बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाचे ‘भांडवल’ करण्यात दोन्ही सेनांत स्पर्धा होती. राहुल गांधींनीही मोदींचे चॅलेंज स्वीकारून बाळासाहेबांना ऑनलाइन आदरांजली वाहिली. पण ‘बाळासाहेब कोणाचे?’ याचा निकाल मतदारच देतील. पवारांमधील लढाई तीव्र होतेय. शरदरावांच्या पत्नी प्रतिभाताईंना ‘बारामती’त रोखल्याच्या बातमीचे भांडवल करून अजित पवारांना पुन्हा टार्गेट केले खरे, पण वास्तव समोर आल्याने पवार गटाचा डाव फसलाय.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)