लख लख दिव्यांनी अन्नछत्र मंडळ,आकर्षक फुलांनी समाधी मठ सजले:अक्कलकोट येथे दाखल झाल्या राज्यभरातील दिंड्या

2 hours ago 1
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर, महाप्रसाद गृह समोरील कपिला गाय येथे दीप लाऊन भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. . लख.. लख..दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला. याप्रसंगी धर्मांदायसह आयुक्त राहुल मामू, पुणे सहकुटुंब उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलका भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, खजिनदार स्मिता कदम, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे आदी उपस्थित होते. अन्नछत्रात प्रसादासाठी गर्दी... कार्तिक पोर्णिमे निमित्त अन्नछत्र मंडळात विधिवत पूजा-आर्चा, संपन्न झाल्यानंतर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याशिवाय राज्यातील विविध भागातून दिंडी व पालख्या अक्कलकोटमध्ये दाखल झाल्या होत्या. यांची सोय देखील न्यासाने केलेली होती. अन्नछत्रच्या जागेतून वाहने सोडल्याने कोंडी कमी झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article