मणिपूर पुन्हा धगधगतंय, आमदार-मंत्र्यांची घरं जाळली; बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला

1 hour ago 1

Manipur Violence News : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पुन्हा एकदा मणिपूरमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आमदार मंत्र्यांच्या घरावर जमाकडून हल्ले करण्यात येत आहेत. गाड्या जाळल्या जात आहेत. असं असताना बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

मणिपूर पुन्हा धगधगतंय, आमदार-मंत्र्यांची घरं जाळली; बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला

बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला

| Updated on: Nov 18, 2024 | 11:00 AM

भारताचा ईशान्येकडूील भाग पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांनी धगधगतो आहे. 15 नोव्हेंबरला मणिपूर- आसाम राज्यांच्या सीमेवर असमाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडू लागल्या. 16 नोव्हेंबरला संतप्त जमावाने इंफाळ भागातील आमदार आणि मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. तिथे असलेल्या गाड्यादेखील जाळण्यात आल्या. इंफाळ भागात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच जिथे हिंसाचारी शक्यता आहे. अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला

मणिपूरमध्ये NPP (नॅशनल पीपल्स पार्टी) ने बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला आहे. मणिपूर विधानसभेत NPP पक्षाचे ७ आमदार आहेत. ६० आमदारांच्या मणिपूर विधानसभेचा बहुमताचा आकडा ३१ आहे. विधानसभेत भाजपचे ३२ आमदार आहेत. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात मागच्या दीड वर्षांपासून सरकारला अपयश येत असल्याने NPP ने पाठिंबा काढला आहे. मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. आता काही महिला आणि लहान मुलं यांचे मृतदेह सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article