फौजदारी कायद्याची अपरिहार्यता, प्रासंगिकतेवर विद्यार्थ्यांना दिले धडे:रायसोनी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉतर्फे चर्चासत्र

6 hours ago 1
जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉच्या वतीने नवीन फौजदारी कायदे : अपरिहार्यता आणि प्रासंगिकता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही. येरलागड्डा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. कुलसचिव प्रा. स्नेहिल जयस्वाल आणि स्कूल ऑफ लॉचे अधिष्ठाता डॉ. नित्यानंद पांडे उपस्थित होते. सायबर क्राइम, दहशतवाद आणि तस्करी यासारख्या समस्यांबाबत सध्याच्या कायद्यातील महत्त्वाच्या तफावतीवर येरलागड्डा यांनी प्रकाश टाकला. तसेच कायदेशीर चौकटींना आधुनिकतेशी जुळवून घेण्याचे सुचवले. डॉ. देशपांडे यांनी समाजातील बदल आणि लोकांच्या मानसिक बदलातून कायद्यात बदल होत असतात, असे सांगून कायद्यातील बारकाव्यांकडे कायद्याचे विद्यार्थी म्हणून विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, असे आवाहन केले. डॉ. नित्यानंद पांडे यांनीही मार्गदर्शन केले. पहिल्या तांत्रिक सत्रात नवीन फौजदारी कायदे : अपरिहार्यता आणि प्रासंगिकता या विषयावर एमिटी लॉ स्कूल, एमिटी युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेरचे डॉ. हेमंत सिंग यांनी तर स्कूल ऑफ लॉचे प्रा. भुवनेश बावनकर यांनी विचार मांडले. दुसऱ्या तांत्रिक सत्रात भारतीय न्याय संहिता : शिक्षेपासून न्यायापर्यंत या विषयावर, बेनेट विद्यापीठाचे प्रा. डॉ. केशव झा यांनी तसेच लॉ स्कूलचे प्रा. डॉ. रंजन डुबे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्षितिजा देशमुख यांनी केले, तर आभार डॉ. मीनाक्षी काळे यांनी मानले. देशभरातून १४० जण चर्चासत्रात सहभागी झाले होते. सहसंयोजक म्हणून प्रा. कोमल खजोणे यांनी भूमिका निभावली. प्रा. शीतल वरणकर, प्रा. भुवनेश बावनकर, प्रा. डॉ. रेणू मोहोड व प्रा. स्नेहल डोंगरे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article