Published on
:
05 Feb 2025, 1:17 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:17 am
अर्जदार कोणताही असो, कर्ज मागणीचा अर्ज आल्यानंतर बँक ग्राहकाचा पूर्ण अभ्यास करत असते. यामध्ये सदर अर्जदार कर्ज परतफेड वेळेत करण्यासाठी किती सक्षम आहे, ते प्रामुख्याने तपासले जाते. कर्ज मागणी करणार्या ग्राहकाच्या आर्थिक शिस्तीच्या सवयी कशा आहेत, हे अगदी त्याच्या बचत खात्यावरूनदेखील स्पष्ट होत असते. याच पार्श्वभूमीवर एखादे कर्ज मंजूर करत असताना बँकेची चेकलिस्ट काय असते, त्याचा हा लेखाजोखा...
बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी सिबिल स्कोअर सर्वात महत्त्वाचा असतो. आपला सिबिल स्कोअर हा आपल्या आर्थिक व्यवहारावरून ठरत असतो. पूर्वी घेतलेल्या क र्जाचे हप्ते आपण नियमित भरले आहेत का, क्रेडिट कार्ड असेल, तर त्याची देयके वेळेवर भागवली आहेत का, आपण दिलेले चेक बाऊन्स तर झालेले नाहीत ना अशा अनेक बाबींवर हा सिबिल स्कोअर ठरत असतो. आपल्याकडील सिबिल स्कोअर 900 पर्यंत असतो आणि तो 650 ते 700 पेक्षा अधिक असेल, तर क र्ज मिळणे सोपे जाते. ‘जितका सिबिल स्कोअर उत्तम तितके क र्ज मिळणे सुलभ’ हे सोपे गणित यामागे आहे.
2. नियमित उत्पन्न, रोखे, गुंतवणूक
अर्जदार वेळेत कर्जाची परतफेड करण्यासाठी किती सक्षम आहे, यासाठी आणखी एक महत्वाचा निकष म्हणजे त्याचे नियमित उत्पन्न किती आहे आणि त्याने रोखे, ठेवी अशांमध्ये केलेली गुंतवणूक. अर्जदाराचे नियमित उत्पन्न व त्याच्याकडील गंगाजळी जितकी भरभक्कम, तितके क र्ज प्रकरण मंजूर होण्याची शक्यता अधिक.
3. नोकरी व व्यवसायाबाबतचे निकष
बँका नेहमी आर्थिक स्थैर्य तपासून पाहत असतात. अर्जदार नोकरीत असेल, तर तो क ार्यरत असलेल्या संस्थेची पत कशी आहे, हे महत्त्वाचे असते. शिवाय, नोकरीतील कालावधी किमान 6 महिने पूर्ण झालेला असेल, याक डे बँकेचे लक्ष असते. अर्जदार व्यावसायिक असेल, तर त्याचा व्यवसाय किमान दोन वर्षांपूर्वीपासून चालत आलेला असेल, ही बाबही बँकेसाठी महत्त्वाची असते.
कोणत्याही कर्जासाठी अर्ज करताना आपण आपले उत्पन्न व आपली कर्जाची मागणी याचा योग्य ताळमेळ बसेल, याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. क ारण, आपण आपल्याला मिळालेल्या कर्जाची व्याजासह विहित वेळेत परतफेड करण्यासाठी किती सक्षम आहोत, हे बँक ांसाठी विशेष महत्त्वाचे असते.
5. कर्जासाठी लागणारी क ागदपत्रे
आधार कार्ड, बँक खात्याचे 6 महिन्यांचे स्टेटमेंट, नोकरीत असल्यास 3 महिन्यांच्या पे स्लीप, व्यवसाय असल्यास बँक स्टेटमेंट, आयटी रिटर्न्स, निवासाचा पुरावा, पासपोर्ट साईजचे फ ोटो, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
समजा, एखाद्याने 60 लाख रुपयांचे गृह कर्ज 10 टक्के दराने घेतले, तर त्याचा ईएमआय अर्थात मासिक हप्ता 54,540 रुपये इतका होतो आणि 25 वर्षांच्या कालावधीतील व्याजापोटी भरावी लागणारी रक्कम ही 1 कोटी 63 लाख 62 हजार रुपये इतकी होते. यासाठीच आपण आपले इतर उत्पन्नाचे आणि गुंतवणुकीचे मार्ग लक्षात घेऊन बँकेकडे आपली कर्जाची मागणी करायला हवी.