‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेने एकवटले मुस्लिम:तरी तारू शकले नाहीत मविआला, या वेळी मुस्लिमांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व घटले

2 hours ago 1
नरेंद्र मोदी यांचे ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथांचे ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि देवेंद्र फडणवीसांचे ‘व्होट जिहाद’चे नरेटिव्ह पूर्णत: यशस्वी झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. हिंदू मतांची बेरीज करण्यासाठीचे इलेक्शन मॅनेजमेंट महायुतीच्या खरोखर पथ्यावर पडले आहे. तिन्ही भाजप नेत्यांच्या विधानांमुळे मुस्लिम समाज आपसात एकवटला. त्यांनी महाविकास आघाडी, एमआयएमच्या पारड्यात मतदान टाकले, पण त्यांच्या मतांमुळे महाविकास आघाडी आणि एमआयएमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. एमआयएम १४ जागा लढले २०११ जनगणनेनुसार राज्यात १२ ते १३% मुस्लिम समाज आहे. मात्र तुलनेने प्रतिनिधित्व मिळत नाही. मावळत्या विधानसभेत फक्त १० आमदार होते. या वेळी एमआयएमने १४ जागा लढल्या, पण फक्त मालेगावात विजय मिळू शकला. पुढे काय ? मुस्लिम समाजाचे विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी अबू असीम आझमींसारखे एकमेव आक्रमक नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) हसन मुश्रीफ पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. येथे दिसला प्रभाव मुंबई : ठाणे, भिवंडी, वांद्रे, अणुशक्तीनगर, मालाड, मुंबादेवी मानखुर्द शिवाजीनगर सपाचे दोन आमदार मावळत्या विधानसभेत काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी, सपा, एमआयएमचे २-२ आमदार होते. आता अजितदादा गटाच्या सना मलिक, हसन मुश्रीफ, सपाचे अबू असीम आझमी, रईस शेख, एमआयएमचे मालेगाव मतदारसंघातील मुफ्ती इस्माईल विजयी झाले. विदर्भ : ११ जिल्ह्यांत मुस्लिमांची संख्या तशी तुरळक आहे. पण बुलडाणा, वाशिमला लक्षणीय आहे. खान्देश : धुळे, मालेगाव, नाशिक, अहमदनगर मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर मध्य आणि पूर्व

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article