बामखेड्यात 89 वर्षीय आजीबाईंचे गृह मतदान:लोकशाही बळकटीचे सर्वांना आवाहन
6 days ago
2
निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांगांना गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील बामखेडा त.त. येथील (मतदान यादी भाग क्र. १०७ व १०८ मधील) ८५ वर्षांवरील पाच ज्येष्ठ (वयोवृद्ध) मतदारांची नोंदणी केली होती. त्या सर्वांनी गृह मतदान करून इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. नोंदणी झाल्यानुसार बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा व सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद कुलथे, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख शिरीष वळवी, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पाटील, शिक्षिका शीतल साळुंखे यांच्या उपस्थितीत गोपनीयता राखत गृह मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यात काशीबाई लिमजी चौधरी (वय ८९), काशीबाई लक्ष्मण चौधरी (८८), हरी नारायण चौधरी (८५) व कमलाबाई रामदास सोनवणे(वय ८६) यांनी गृह मतदान करून आपला हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान केले, आपण सर्वांनीही मतदान करावे, असे आवाहन ८९ वर्षीय आजीबाई काशीबाई चौधरी यांनी यावेळी बोलताना केले. दरम्यान यंदा प्रथमच राबवलेल्या गृह मतदान उपक्रमांचे ज्येष्ठ मंडळी व दिव्यांग बांधवांनी कौतुक केले. नातेवाइकांनीही समाधान व्यक्त केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)