बारामतीत फकीराप्रमाणे निवडणूक लढवली, विजयाची खात्री नव्हती:'पक्ष-चिन्ह परत घेत नाही, तो पर्यंत लढा'; सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

1 hour ago 1
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्यामुळे या दृष्ट्रीकोणातून राजकीय नेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या आहेत. याच दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान समोर आले आहे. एका मुलाखतीदरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी बारामती लोकसभा मतदारसंघातून फकीराप्रमाणे निवडणूक लढवली. मला विजयाची शंभर टक्के खात्री नव्हती. सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कदाचित हे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतरच योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री केले जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 'तोपर्यंत लढा सुरूच राहणार' ईशान्य मुंबईतील अणुशक्ती नगर येथे महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) मेळाव्याला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जोपर्यंत वडील शरद पवार यांनी तयार केलेला पक्ष आणि निवडणूक चिन्ह त्यांना परत देत नाही तो पर्यंत माझा लढा संपणार नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते. यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’दिले होते. आता शरद पवार यांच्या पक्षाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव देण्यात आले आहे. सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल ईशान्य मुंबईतील अणुशक्ती नगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला संबोधित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जोपर्यंत मी पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह परत देत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही." युतीमधील नेत्यांवर देखील त्यांनी टीका केली. "ज्यांना नवाब मलिक यांची ॲलर्जी होती, त्यांचे काय झाले?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा!:नारायण गडावर आयोजनासाठी चाचपणी; राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हेदेखील आता दसरा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी नारायणगडावर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका ते या मेळाव्याच्या माध्यमातूनच स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा... अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी; पोलिसांच्या निलंबणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल बदलापूरच्या अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित ठेवण्यात यावे अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा... धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका:नरहरी झिरवळ आक्रमक; मंत्रालयालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी सोमवारपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराच त्यांनी दिली आहे. इतर आदिवासी आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. पूर्ण बातमी वाचा... निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article