बाळासाहेबांच्या निधनाचा दुखवटा प्रस्ताव काँग्रेसने धुडकावला होता:देवरांचा आरोप, 12 वर्षांनी काँग्रेसला बाळासाहेबांची आठवण
1 hour ago
1
मोदी-अमित शाह यांचे आव्हान स्वीकारत राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. त्यामुळे उद्धवसेना समर्थकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा प्रस्ताव १२ वर्षांपूर्वी काँग्रेसनेच धुडकावला होता, असा आरोप वरळीतील शिंदेसेनेचे उमेदवार, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे. राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करून दाखवावी, असे आव्हान मोदी आणि शाह यांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर सभेत दिले होते. त्यावर शुक्रवारी प्रियंका गांधी यांंनी वक्तव्य केले. बाळासाहेबांविषयी आदर व्यक्त केला होता. शनिवारी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी एक्सवरून त्यांना आदरांजली वाहिली. देवरा यांनी राहुल यांच्या या कृतीचे स्वागत केले. ते म्हणाले की, १२ वर्षांपूर्वी मुंबईचा प्रतिनिधी, केंद्रीय मंत्री या नात्याने मी बाळासाहेबांच्या निधनावर राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा, असा प्रस्ताव केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारकडे मांडला होता. त्याचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी समर्थन केले होते. मात्र यूपीएमधील काही घटक पक्ष आणि काँग्रेसमधील वरिष्ठांनी तो प्रस्ताव धुडाकावून लावला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)