विवाह सोहळ्यात मतदान करण्याची शपथ:मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न, वधू- वरही उतरले जनजागृतीच्या उपक्रमात

1 hour ago 1
लोकशाहीचा महापर्व २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान सद्यःस्थितीत लग्न समारंभाच्या तारखा आहेत. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक हे लग्न समारंभासाठी उपस्थित दर्शवितात. दरम्यान रविवार १७ नोव्हेंबर रोजी वर्षा गार्डन अहमदपूर येथे मोरे व नळगीरे परिवार तर लातूर येथील शांताई मंगल कार्यालय चवळे व बिडवे परिवाराच्या विवाह सोहळ्यात तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाने मतदान जनजागृती केली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी आपला हक्क बजवावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदारांनी इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावे, असे आवाहन केले. या विवाह सोहळ्यातील वधु-वर यांच्यासह पालक, नातेवाईक, पाहुणे मंडळींना तहसील कार्यालय अहमदपूर च्या वतीने स्वीपचे सदस्य महादेव खळुरे, कपिल बिरादार, प्रा.शिवशंकर पाटील, शिवकुमार गुळवे यांच्या उपस्थितीत पाहुण्यांना स्वीप सदस्य कपिल बिरादार यांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठीची शपथ दिली. तसेच मतदान जनजागृतीचे बॅनर हातात घेऊन मंडपातील मतदार बंधूंना विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article