Devendra Fadnavis connected Sharad Pawar : 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवींसाचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. राज्यात जी राष्ट्रपती राजवटी लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. त्यानंतर tv9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिपण्णी केली.
शरद पवार काय म्हणाले होते?
मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, राजकारणात माझं स्थान काय आहे, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रतिवार केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.