कन्नडमध्ये 2004 पासून जाधव दोनदा तर राजपूतांची एकदा बाजी:आता संजना जाधव यांच्याही इंट्रीने रंगत

2 hours ago 1
गेल्या ४ पंचवार्षिकपासून कट्टर प्रतिस्पर्धी हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंह राजपूत (ठाकरे गट) यांच्यामध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. या वेळी संजना जाधव यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळाल्याने या मतदार संघाची लढत लक्षवेधी ठरत आहे. मूळ शिवसेना ही शिंदे सेना आणि ठाकरे सेना व विभक्त कुटुंब अशा लढतीच्या पार्श्वभूमीवर निकालाचा अंदाज वर्तवणे भल्याभल्यांनाही कठीण होऊन बसले आहे. २००४ पासून २०१९ पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन जाधव हे दोन वेळेला तर उदयसिंग राजपूत एक वेळेला निवडून गेले आहे. २००४ मध्ये शिवसेनेकडून नामदेव पवार यांनी ३५९५१ मते, तर काँग्रेसचे नितीन पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची ३५२५१ मते मिळाली होती. केवळ ७०० मतांनी पवार विजयी ठरले होते. तिसऱ्या क्रमांकावर हर्षवर्धन जाधवांना ३४,२७८ तर चौथ्या क्रमांकाची उदयसिंग २०१४ मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी मनसे सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यांना ६२५४२ मते मिळाली तर उदयसिंग राजपूत यांनी राष्ट्रवादीकडून लढत देताना ६०९८१ मते मिळवली. या वेळी सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन जाधव यांनी १५६१ मतांची आघाडी घेऊन विधानसभेचे द्वार ठोठावले होते. २०१९ मध्ये पक्षीय उलटफेर होऊन शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत यांना ७९२२५ तर अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना ६०५३५ मते मिळाली. १८६९० चे मताधिक्य घेऊन उदयसिंग राजपूत विजयी ठरले होते. राष्ट्रवादीकडून प्रथमच लढताना संतोष कोल्हे यांनी ४३६२५ मते मिळवून तालुक्याचे लक्ष आकर्षित केले होते. राजपूत यांना ३३,७८९ अशी मते मिळाली होती.दोघांच्या मतातील अंतर केवळ ४८९ होते. २००९ मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी मनसेकडून निवडणूक लढवत ४६ हजार १०६ मते घेऊन मराठवाड्याचे मनसेचे खाते उघडत विधानसभा गाठली होती. उदयसिंग राजपूत या वेळी अपक्ष होते. गतवेळी संतोष कोल्हे यांना होती ४३ हजार ६२५ मते

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article