बनावट महिला उभा करून प्लॉट खरेदी, तिघांना पोलिस कोठडी:सेवानिवृत्त शिक्षिकेचा प्लॉट नावावर करून घेत दुसऱ्यांना विकला
2 hours ago
1
सेवानिवृत्त शिक्षिकेच्या नावावरील प्लॉट बोगस महिला उभी करून खरेदी केला. त्यावर इमारतही उभारली. याप्रकरणी सहा जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षिका हर्षदा हेमंत शुक्ल यांचा इसबाबी हद्दीतील गट क्रमांक ११९/४ मधील प्लॉट क्रमांक ५९ चा बोगस महिला उभी करून खरेदी करून इमारत बांधली. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरोधात न्यायालयाचे आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती अशी, सेवानिवृत्त शिक्षिका यांनी हा प्लॉट २००१ मध्ये खरेदी केला. परंतु पतीच्या निधनानंतर त्यांना सदर जागेकडे जास्त जाणे-येणे करता आले नाही. याचा गैरफायदा घेऊन यातील आरोपींनी संगणमत करून हर्षदा शुक्ल यांचे बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार करून पंढरपूर दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांच्या ठिकाणी बनावट महिला उभी करून सरस्वती मसू माने या महिलेच्या नावावर खरेदी केला. पुढे मानेच्या नावावरून राजू खंडाळे याच्या नावावर सदर प्लॉट केला. त्यानंतर तेथे बेकायदा बांधकाम केले. या प्रकरणी पोलिसानी दखल न घेतल्याने शुल्क यांनी ॲड. इंद्रजित परिचारक, ॲड. ओंकार बुरकुल यांच्यामार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. जे. खोमणे यांनी गुन्ह्याचा रिपोर्ट सादर करत सरस्वती माने (रा. भटुंबरे), भय्या अवघडे (रा. मंगळवेढा), अनिता भालेराव (रा. मंगळवेढा), राजू खंडाळे (रा. घोटी, ता. माढा), सुनील पाटोळे (रा. मेंढापूर), शशिकांत आटकळे (रा. दाळे गल्ली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.तपास सहायक पोलिस निरीक्षक मोनिका खडके पाटील या करत आहेत. तिघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी याप्रकरणी पोलिसांनी राजू खंडाळे, सुनील पाटोळे, शशिकांत आटकळे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार, दि. १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)