बीएमसीचा 74 हजार 427 कोटींचा अर्थसंकल्प सादर:पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, पर्यटन आणि प्रदूषणावर भर; 'मुंबई आय' उभारणार
2 hours ago
1
बहन्मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज जाहीर केला. मुंबई मनपाने आतापर्यंतचा सर्वाधिक 74 हजार 427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये मुंबईतील पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, पर्यटन आणि प्रदूषण यावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. बीएमसी ही आशियातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका आहे. प्रशासकीय राजवटीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी 113.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सुयोग्य जागी 'लंडन आय'च्या धरतीवरती सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे. यासोबतच राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात जिराफ ,झेब्रा, सफेद सिंह जॅग्वार इत्यादी विदेशी प्राण्यांसाठीची प्रदर्शनी उभारण्यात येणार आहे. शहरातील कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बँकांच्या ठेवीमधून 16 हजार कोटी काढणार
सध्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 81 हजार 774.42 इतक्या ठेवी आहेत. पालिकेच्या बँकांमधील ठेवीमधून 2023-24 आर्थिक वर्षात 6364.48 कोटी इतका निधी काढण्यात आला होता. 2024-25 पर्यंत 12 हजार 119.47 कोटी इतका निधी काढण्यात आला. 2025 -26 मध्ये 16 हजार 699.78 कोटी इतका निधी काढला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. कर आणि शुल्क वाढणार
मुंबईमधील 2 लाख 50 हजार पैकी 50 हजार झोपडपट्टीमध्ये उद्योगधंदे सुरू आहेत. त्यांच्यावर मालमत्ता कर लावून झोपडपट्टीधारकांना सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक मालमत्तांवर करामधून 350 कोटी महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापन खर्च वाढला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच स्वच्छ आणि निरोगी मुंबईसाठी घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्याचा विचार पालिकेचा आहे. अर्थसंकल्पात काय तरतूदी? गेल्या पाच वर्षांचा बीएमसीचा अर्थसंकल्प
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)