Published on
:
08 Feb 2025, 7:33 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:33 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. एकीकडे आपचे दिग्गज नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसाेदिया पराभूत हाेत असताना मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) कालकाजी मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर मार्लेना यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारली होती. त्यामुळे या निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातील लढत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. (Delhi Assembly Elections)
आज दिल्ली विधानसभेसाठी मतमोजणी झाली. पहिल्याच फेरीत, कालकाजी मतदारसंघातून उमेदवार रमेश बिधुरी ६७३ मतांनी आघाडी घेतली. तेव्हापासून त्यांनी ही आघाडी अबाधित ठेवली. चौथ्या फेरीत १७,०६० तर आतिशी यांना १५४२५ आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांना १५०८ मते होती. मतमोजणीच्या १२ पैकी ९ फेरीत आतिशी यांनी पिछाडी भरुन काढली. यानंतर केवळ २३८ मतांनी पिछाडीवर होत्या. त्यांच्या पराभवाची चर्चा सुरु असतानाच अखेर ११ व्या फेरीत अतिशी २,७३६ मतांनी आघाडी येत विजय मिळवला.