कोरेगाव (Gadchiroli):- देसाईगंज तालूक्यातील कोरेगाव येथे वनविभागाच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात चोप येथिल वामन दाजिबा गेडाम हा स्वतःच्या शेतात काम करीत असतांना अस्वलाने(bear)हल्ला करून जखमी केले होते. त्याला वनविभागाने 7 फेब्रुवारीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचे हस्ते पाच लाखाचा धनादेश देण्यात आला तर डोंगरमेंढा सयुक्तवन व्यवस्थापन समीती तर्फे शामा प्रसाद मुर्खीजी जनवन योजने अंतर्गत 10 लार्भात्यांना LPG गॅस कनेक्शन चे वाटप करण्यात आले व वनवनवा जागृती सप्ताह 1 ते 7 फरवरी राबविल्या गेला.
शेतात काम करीत असतांना अस्वलाने केला हल्ला
या दरम्यान शंकरपूर, चोप, कोरेगाव, कसारी, रावनवाडी, टोली, बोळधा येथे सभा घेऊन वनवनवा जागृती करण्यात आली तसेच सप्ताहाचे समापण करण्यात आले व वन्य प्राण्याच्या पासुन सुरक्षिते कसे राहावे याची जागृती करून वनविभाग रात्री व दिवसाची गस्त घालत असून बाहेरील व्यक्ती आढळल्यास तपासनी करून ती व्यक्ती जंगली प्राण्याच्या शिकारी तर नाही असी खात्री केल्या जाते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामदासजी मसराम हे होते. या वेळी प्रमुख अतिथी वनपरीक्षेत्र अधिकारी धोंडणे, सौ . कुंदाताई गायकवाड सरपंचा कोरेगाव, उपसरपंच धनंजय तिरपूडे, शंकरपूर क्षेसहायक विजय कंकलवार, समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, वनरक्षक दहीकर, वनरक्षक लांजेवार, वनरक्षक जांभुळकर मॅडम, वनरक्षक रोडमेक, वनकर्मचारी व गावातीत नागरीक उपस्थित होते.