IRCTC Railway Online Ticket Booking: रेल्वे तिकीट ऑनलाईन अन् ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने काढण्यात येते. रेल्वे काऊंटरवर म्हणजेच ऑफलाईन तिकिटापेक्षा ऑनलाईन तिकिटांची किंमत जास्त असते. यासंदर्भात राज्यसभेत शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला. त्याला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. ऑनलाईन तिकिटास सुविधा शुल्क आणि ट्राजँक्शन शुल्क लागत असल्यामुळे ते महाग असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
राज्यसभेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेची ऑनलाईन तिकीटे आयआरसीटीसी (IRCTC) मार्फत बुक केली जातात. त्यासाठी सुविधा शुल्क आणि ट्राजँक्शन शुल्क लागते. त्यामुळे रेल्वे काऊंटरपेक्षा ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर जास्त पैसे लागत असतात. IRCTC ऑनलाइन तिकिटासाठी खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी सुविधा शुल्क घेतले जाते. हा पैसा सिस्टमची देखभाल दुरुस्ती, अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी वापरला जातो. तसेच ग्राहकांना बँकांचे शुल्कही ऑनलाईन तिकिटासाठी द्यावे लागत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
ऑनलाईन तिकिटावर कोणकोणते शुल्क
आयआरसीटीसी रेल्वेची ऑनलाईन तिकीट सेवा प्रदान करणारी संस्था आहे. लोकांना घरी बसून तिकीट बुक करण्याची सुविधा आयआरसीटीसीकडून दिली जाते. त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क आरआरसीटीसीकडून घेतले जाते. हे शुल्क दोन प्रकारचे आहे. त्यात सुविधा शुल्क आणि ट्राजँक्शन शुल्क आहे. सुविधा शुल्क आपल्या सेवांच्या मोबदल्यात आयआरसीटीसीकडून घेतले जाते. हा पैसा ऑनलाईन प्रणाली अधिक चांगली करण्यासाठी वापरला जातो. ट्राजँक्शन शुल्क बँके ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेसाठी घेतले जाते.
हे सुद्धा वाचा
80% तिकिटांची विक्री ऑनलाईन पद्धतीने
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीला ऑनलाइन तिकीट सुविधा प्रदान करण्यासाठी खूप खर्च करावे लागते. तसेच तिकीट सुविधांची देखभाल, अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी आयआरसीटीसीकडून सुविधा शुल्क घेतले जाते. याशिवाय ग्राहक बँकांना व्यवहार शुल्कही भरतात. आता रेल्वेची 80% पेक्षा जास्त आरक्षित तिकिटे ऑनलाइन बुक केली जात आहेत. यावरून ऑनलाइन सुविधांचा वाढता वापर दिसून येतो. ऑनलाइन बुकिंगमुळे प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण काउंटरवर जाण्याच्या त्रासापासून सुटका मिळते आणि प्रवासाचा वेळ आणि वाहतूक खर्चही वाचतो.