भाजपच्या नोट जिहादने तावडेंचा 'विनोद':पुन्हा एक मराठा नेतृत्व संपवले, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप - सुषमा अंधारे

2 days ago 1
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असा थेट आरोपच सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टीका केली. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला... ! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असे म्हणत देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना विचारला. आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा कशाला निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या? उमेदवारी अर्ज, चिन्ह, स्क्रूटनीचे नाटक कशाला ..? आचारसंहितेच धाक फक्त विरोधकांना दाखवायचा? आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा आणि लगेचच फडणवीस विनोद तावडे यांचा शपथविधी करून टाका. उद्याचे मतदान, परवाच्या निकालाची वाट बघू नका, असा घणाघातही अंधारे यांनी केला. नेमके प्रकरण काय? विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विनोद तावडे आणि भाजप महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न - जयंत पाटील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसने पैसे वाटणे दुर्दैवी - अंबादास दानवे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीत पैसे वाटावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने पैसे वाटले असते तर ठीक मात्र पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि असे पैसे वाटणे म्हणजे अत्यंत दुर्दैव असल्याची, भावना दानवे यांनी व्यक्त केली. विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती - सुप्रिया सुळे यांच्याकडे पैसे येतात कुठून? नोटबंदी भाजपाच्या सरकारने केली. मग एवढ्या नोटा येतात कुठून? एकीकडे नोटबंदी करता मग चलनात एवढी रोख रक्कम येते कुठून? विनोद तावडेंवर हा आरोप होतोय ही अतिशय धक्कादायक बाब आहे. भाजपाच्या ओरिजिनिल लोकांकडून अशी कृती कधीच होणार नाही. ही अस्वस्थ करणारी कृती असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हे ही वाचा... विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप:बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले, नालासोपारा येथील घटना; VIDEO महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आता राजकीय पक्षांनी मतदारांच्या गुप्त भेटीगाठी व बैठकांवर जोर दिला आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article