रविवारी भारत आणि इंग्लंडमधील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना पार पडला. भारत तब्बल 150 धावांनी हा सामना जिंकला आहे, अनेक सेलिब्रिटी हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजर होते. सर्वांनीच भारताचा विजय साजरा केला. यावेळी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनही आले होते. या बाप-लेकानेही भारताचा विजय साजरा केला. स्टेडियमवरून घरी परतत असताना, बिग बी आणि अभिषेकने एका प्रसिद्ध ठिकाणी जेवनही केलं.
बिग बी आणि अभिषेकेचं 84 वर्षांच्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये डिनर
बिग बी आणि अभिषेक 84 वर्षांच्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी थांबले होते आणि त्यांनी परिपूर्ण जेवणाचा आस्वाद घेतला. पण, सुपरस्टार पिता-पुत्राची जोडी पाहून रेस्टॉरंट मालकालाही विश्वास बसला नाही. बिग बी आणि अभिषेक मद्रास कॅफेमध्ये जेवणासाठी थांबले होते.
किंग्ज सर्कल गार्डनजवळील मद्रास कॅफेचे मालक देवव्रत कामथ यांना फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितले की सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये येत आहेत.हॉटेल मालकाला फोन कॉलवर विश्वास बसला नाही.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक दोघेही वानखेडे स्टेडियमवरून टी-20 सामन्यानंतर जुहू येथील त्यांच्या घरी परतत असताना, मद्रास कॅफे या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. 16 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्यासह हो पिता-पुत्र कॅफेमध्ये पोहोचेपर्यंत, मालकाला खात्री होत नव्हती की हे सेलिब्रिटी खरोखरच त्यांच्या रेस्टॉरंटला भेट देतील.
अमिताभ आणि अभिषेक यांनी काय ऑर्डर केले?
84 वर्षे जुन्या या रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी काय खाल्लं असेल आणि काय ऑर्डर केलं असेल असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर या दोघांनी या रेस्टॉरंटची खासियत असलेली डीश मागवली. ती म्हणजे बेन्ने डोसा, रागी डोसा, रवा डोसा, तुप्पा डोसा, दही मिसळ, इडली ‘मोलगापोडी’ (लाल मिरच्या, पांढरी उडीद डाळ आणि मीठापासून बनवलेली कोरडी चटणी), ज्याला गनपावडर असेही म्हणतात, डोसा आणि मेदू वडा. अशा सर्व पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला.
जेवणानंतर गरम फिल्टर ‘कॉफी’चा आस्वाद
या सुपरस्टार जोडीने या पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर तेथील गरम फिल्टर ‘कॉफी’चा देखील आस्वाद घेतला, जो स्टेनलेस स्टीलच्या ‘डबरा’ आणि ग्लासमध्ये दिला गेला. त्यांना सर्व पदार्थांचे कौतुकही केले. पण विशेषतः सांबार आणि नारळाच्या चटणीसह बेने डोसा त्यांवा खूप आवडला. रेस्टॉरंटचे मालकांना सांगितलं की, अमिताभ आणि अभिषेक यांनी जेवणाचे खूप कौतुक केले आणि सांगितले की त्यांना जेवण खूप हलके-फुलके वाटले.
अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी इथे नाश्त्याचा आस्वाद घेतला आहे.
अमिताभ आणि अभिषेक यांच्यााधी या रेस्टॉरंटमध्ये राज कपूर, धीरूभाई अंबानी आणि पी चिदंबरम सारख्या सेलिब्रिटींनी देखील तिथे नाश्त्याचा आस्वाद घेतला आहे. पण बच्चन कुटुंबाचा स्टेटस काही वेगळाच आणि भारदस्त असल्याचं रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितलं.