50 हजार 584 रुपये खात्यामधून गायब
सेलू/वर्धा (Cyber thief hack) : सेलू तालुक्यातील तुळजापूर वघाळा येथील शेतकरी गणेश कोल्हे हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांना त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी त्यांच्या सेंट्रल बँक सेवाग्राम शाखेच्या खाते वरती 50584 रुपये जमा केले पैसे (Cyber thief hack) जमा होताच एक तासाने अचानक कोल्हे यांच्या खात्या मधून पैसे गायब झाले. त्यामुळे शेतकरी कोल्हे हे अचंबित झाले.
या घटनेची माहिती बँक शाखा व्यवस्थापकांना देण्यात आली त्यांनी तुमच्या हाताने कुठली मोबाईलची बटन वगैरे दबली असेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी याची रीससर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली ही घटना 28 जानेवारी 2025 रोजी घडली असून, अद्यापही त्यांना त्याचे पैसे मिळाले नाही अचानक खात्यावरून पैसे गायब झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून खाते हॅक (Cyber thief hack) झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी संपर्क केला असता, आज दुपारी मला बँकेच्या क्रेडिट मेसेज आला परंतु माझ्या खाते वरती अजूनही पैसे जमा झाले नाही असे कोल्हे यांनी सांगितले.