प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांचा निकाल!
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रकरण
परभणी (Jintur Crime) : परभणी ते जिंतूर असा बस प्रवास करत असताना चालत्या वाहनात लहान बालकासोबत अश्लिल वर्तन केले. त्याला मुलाच्या आईने विरोध केला असता आरोपीने महिलेच्या अंगास वाईट उद्देशाने स्पर्श केला. या (Jintur Crime) प्रकरणात परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उज्वला एम. नंदेश्वर यांनी आरोपी नितीन सुभाष सोमाणी याला सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली.
१३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी महिलेने जिंतूर पोलिसात तक्रार दिली होती. सदर महिला दिड वर्षाच्या बालकासोबत परभणी ते जिंतूर बस प्रवास करत होती. चांदज पाटीपुढे आरोपीने बालकासोबत अश्लिल वर्तन केले. याला महिलेने विरोध केला असता आरोपीने बालकाला गाडीतून फेकून देईल, अशी धमकी देत महिलेच्या अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. फिर्यादी महिला जिंतूर बसस्थानकावर उतरुन घरी जात असताना आरोपीने अॅटोपर्यंत तिचा पाठलाग करत अश्लिल वर्तन केले. या (Jintur Crime) प्रकरणात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद झाला. सपोनि. विकास कोकाटे यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष पुराव्याचे अवलोकन करत न्यायालयाने आरोपी नितीन सुभाष सोमाणी याला विनयभंगात १ वर्ष सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास सुनावला आहे. तसेच (Jintur Crime) धमकी प्रकरणात सहा महिने वैâद, ५०० रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास सुनावला आहे. पोक्सो कलमान्वये आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, आकाश रेड्डी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.