नागरिकांसोबत साधणार संवाद
हिंगोली () : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विभागातील विविध विषयांचा ते आढावा घेणार आहेत. सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय पातळीवरील आढावा घेणार आहेत. यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ०२ ते ०४ दरम्यान नागरिकांसाठी राखीव असून महसूलमंत्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे नागरिकांशी संवाद साधणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुपारी ०४ वाजता नोंदणी महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नोंदणी महानिरीक्षक, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
सायंकाळी ०६ वाजता भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख उपस्थित राहणार आहेत. आढावा बैठका व नागरिकांना भेटीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असे महसूल विभागाच्या अपर आयुक्त नयना बोंदर्डे यांनी कळविले आहे.