मतदान केंद्रावरून ईव्हीएम दुचाकीवर नेण्याचा प्रयत्न:नागरिकांनी अडवले, गोपालनगर भागातील मराठा कॉलनी परिसरात रात्री उशिरापर्यंत होती गर्दी

10 hours ago 1
शहरातील गोपालनगरातील मराठा कॉलनीमधील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेत मतदान केंद्र होते. या शाळेत पाच बुथ होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान पथकाने पाचही केंद्रातील ईव्हीएमबाहेर काढले. त्यापैकी चार ईव्हीएम वाहनात नेले तर एक ईव्हीएम दोन व्यक्ती दुचाकीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दुचाकीवर इव्हीएम नेण्यास आक्षेप घेऊन त्या व्यक्तींना थाबवले. इव्हीएम दुचाकीवरुन का व कुठे घेऊन जात होते, अशी शंका आल्यामुळे या मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली होती. बुधवारी २०नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यामुळे पोलिसांची कुमक दाखल झाली होती. बडनेरा मतदार संघातील हे केंद्र आहे. पथकातील कर्मचाऱ्यांनी पाचपैकी चार इव्हीएम चारचाकी वाहनाने नेले मात्र एकच दुचाकीवर का नेले, यावरुन हा गोंधळ झाला . या वेळी काही नागरिकांनी शंका उपस्थित केली केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार, निवडणूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. बडनेरातील दुचाकी वर ईव्हीएम नेण्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले . या केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुरक्षित आहे. याबाबत झालेल्या संभ्रमाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रावर पोहोचत आहे. ईव्हीएम बाबत अनुचित प्रकार घडला नाही. उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले कि, प्रथमदर्शनी कोणताही गैरप्रकार झालेला दिसून येत नाही. मतदान पथकाला घेण्यासाठी आलेले वाहन मोठे असल्यामुळे ते शाळेपर्यंत येण्यासाठी अडचण असावी, म्हणून मतदान पथकातील कर्मचारी ईव्हीएम या ठिकाणाहून दुचाकीने मोठ्या वाहन उभे होते, त्या ठिकाणापर्यंत घेवून जात होते, असे समोर येत आहे. तरीही निवडणूक अधिकारी व अन्य अधिकारी पोहचले असून ते इव्हीएमची पडताळणी करत आहेत. बडनेरा मतदार संघातील गोपालनगर भागातील मराठा कॉलनी परिसरात मतदान केंद्राबाहेर झालेली नागरिकांची गर्दी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article