मतदारांनी विरोधकांऐवजी पवारांचीच भाकरी फिरवली:सुप्रियांना मंत्रिपदासाठी एनडीएला पाठिंबा
2 hours ago
1
विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाकरी फिरवा असा शब्द शरद पवार नेहमीच वापरतात. मात्र, विधानसभेला मतदारांनी जबर तडाखा देत शरद पवारांचीच भाकरी फिरवून टाकली. विधानसभेसाठी नवी रणनीती नव्हती 1 लोकसभा आणि विधानसभेत मतदाराची मानसिकता वेगळी असते. याची पूर्ण कल्पना असूनही तशी रणनीती आखली नाही.
2 सगळे राजकारण मराठा समाजाभोवतीच केंद्रित केले. ओबीसी आरक्षणाविरोधात सूर लावला.
३ इतर पक्षांतून ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी नको, हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह पवारांनी सपशेल डावलला.
4 राज्यासमोरील आव्हानांचा कोणताही नवा मुद्दा शरद पवार व त्यांचे सहकारी मांडू शकले नाहीत.
२०१९ मध्येही पक्षाची स्थिती बिकट होती. पण साताऱ्यात भरपावसात सभा घेतल्याने सहानुभूतीची लाट आली. त्यात ५४ जागा मिळाल्या. कांदा उत्पादक, संविधान, पक्षफोडीच्या मुद्द्यावर सहानुभूती घेत लोकसभेला ८ जागांवर विजयी झाले होते. अजित पवारांना नामोहरम करण्यासाठी शक्ती पणाला लावली. इतर पक्षांतून आयात उमेदवारांना पुन्हा संधी दिली. लोकसभेत भाजपला मदतीची गरज आहे. त्यामुळे सुप्रियांना केंद्रीय मंत्रिपदाच्या मोबदल्यात पवार एनडीएमध्ये जाऊ शकतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)