रत्नागिरी : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव स्वीकारताना पोमेंडी बु. सरपंच ममता जोशी.pudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 1:15 am
Updated on
:
04 Feb 2025, 1:15 am
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतस्तरावर यशस्वीपणे राबवल्याबद्दल दिल्लीत प्रजासत्ताक दिनासाठी बोलवण्यात आलेल्या रत्नागिरी पोमेंडी बु.च्या सरपंच ममता अंकुश जोशी यांचा विशेष सन्मान केंद्रीय पंचायतराज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. देशभरातील 555 सरपंचांमधून 11 सरपंचांना सन्मानित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या योजना राबवताना दहा विविध निकष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु.च्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला विशेष निमंत्रित म्हणून केंद्र शासनाने निवड केली होती. प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत उपस्थित सरपंचांचे योजना चांगल्या राबवल्याबद्दल अभिनंदन केले. यातही 555 सरपंचांमधून 11 सरपंचांचा केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह आणि पंचायती राज राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी गौरव केला. या 11 मध्ये राजातील दोन सरपंच असून ममता जोशी, धाराशिवमधील सरपंचांचा गौरव केला.