मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20I सामना जिंकला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने मोहिम फत्ते केली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहितसेना एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत इंग्लंडविरुद्ध एकूण 3 सामने खेळणार आहे.
रोहितसेना बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर या एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. तर जोस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या हिशोबाने महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांमध्ये रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे.
मालिकेबाबत थोडक्यात
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांकडून 30 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. एकूण 7 दिवसांदरम्यान 3 सामने खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 6 फेब्रुवारीला होणार आहे. अंतिम सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर 9 फेब्रुवारीला दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 6 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना, 9 फेब्रुवारी, कटक
तिसरा सामना, 12 फेब्रुवारी, अहमदाबाद
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).