नेवासा : तालुक्यात अनेक ठिकाणी युरियासह रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला असून, खतांची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. परंतु काही ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत.
रब्बी हंगामात गहू व हरभरा, तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून, त्यासाठी शेतकर्यांना युरिया व इतर रासायनिक खतांची मोठी मागणी होत आहे, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. औषधे व खते पुरवणार्या कंपन्या युरिया व रासायनिक खतांबरोबरच त्यांचे इतर उत्पादनांची खरेदी करायला भाग पडत आहे.
त्याचा परिणाम खतेविक्रेत्यांवर होताना दिसून येत आहे. युरिया व 10.26.26 ही खते तालुक्यात मिळतच नाही. कृषी विभाग रासायनिक खतांचा तुटवडा नसल्याचा डांगोरा पिटत आहे. परंतु प्रत्यक्षात युरिया व इतर रासायनिक खतांची टंचाईच आहे. शहरातील दुकानदारांकडे युरिया व 10. 26.26 नसल्याचे शेतकरी सांगतात.