विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षांनी शंका व्यक्त केली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई हायकोर्टान याबाबद्दल निवडणूक आयोगाला नोटीस देखील बजावली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील थेट संसदे मधून महाराष्ट्राच्या निकाला वर शंका व्यक्त केली आहे
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधकांनी शंका व्यक्त केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवले. विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर वाढलेल्या मतदानाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टान हे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर झालेले 76 लाख मतदान संशय व्यक्त करणार आहे. सायंकाळी सहानंतर निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली होती का? निवडणूक आयोगान आदर्श नियमावलीचे पालन केलं नाही. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि 2024 साली सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक आहे. असा युक्तिवाद स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टात केला. यावर मुंबई हायकोर्टान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रिय निवडणूक आयोगान नोटीस पाठवली. या प्रकरणात आता दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली होती. मतदारांनी केलेले मतदान आपल्यापर्यंत पोहोचले नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मारकाडवाडी गावात झालेल्या मतदानावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जाणकर यांनी आक्षेप घेतला आहे. आता प्रकाश आंबेडकरांनी ही संध्याकाळी सहा नंतर झालेल्या 76 लाख मतदानावर शंका व्यक्त केली आहे.
Published on: Feb 04, 2025 11:26 AM