परभणी(Parbhani) :- अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget) शेती क्षेत्रासाठी निराशा जनक असून यात केवळ घोषणा व पोकळ वल्गणा करण्यात आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीत आंदोलन
शेती व वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वाधिक शाश्वत रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र याकडे केंद्र सरकारने (Central Govt) पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. शेतकर्यांना अर्थसंकल्पातू शाश्वत असे काहीच मिळालेले नाही, अर्थसंकल्पाचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, प्रसाद गरुड, सुदाम ढगे यांची उपस्थिती होती.