मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार मराठी चित्रपट इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकीच म्हणजे सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर. या दोघांचीही नावे आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मानाने घेतली जातात.
या दोन्ही कलाकारांनी उत्तम अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यांच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. मात्र एक असा काळ होता जेव्हा सुबोध भावेमुळे चक्क चिन्मय मांडलेकरांना घरी बसावं लागलं होतं.
सुबोध भावेमुळे नव्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं
चिन्मय मांडलेकरांकडे अनेक प्रोजेक्ट येत असूनही त्यांना कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं. चिन्मय मांडलेकरांना बऱ्याचदा मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्याने सुबोधमुळे चिन्मय मांडलेकर यांना चक्क सात महिने कामाशिवाय रहावं लागलं होतं.
एका मुलाखतीदरम्यान चिन्मय मांडलेकरांनी सुबोध भावेसोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं. इतंकच नाही तर त्याच्यामुळे तब्बल सात महिने काम न मिळाल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. तो किस्सा काय होता आणि सुबोध भावेंमुळे चिन्मय यांना चक्क घरी का बसावं लागलं होतं त्याबद्दल जाणून घेऊयात.
चिन्मय यांनी सुबोध भावें सोबतचा तो अनुभव सांगितला
चिन्मय यांनी सांगितलं की, ‘मी केवळ चित्रपट करणार हे ठरवलेलं होतं. मला मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा नव्हती, परंतु इथं आल्यास कळालं की, नाटक आणि जुजबी सिनमे आधी करावे लागतात. मुंबईत आल्यावर जे काम मिळेल ते मी केलं. आणि पलटी मारली. याच काळात वादळवाट नावाची नवीन मालिका आली. माझ्या मित्राने मला ऑडिशन द्यायला लावली.’ असं म्हणत चिन्मय यांनी त्यांच्या कामाच्या स्वरुपाबद्दल स्पष्ट केलं.
चिन्मय यांच्या लिखाणाला खरी दिशा कशी मिळाली?
पुढे चिन्मय म्हणाले की, ” मला अजूनही चांगलं आठवतंय 3 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती आणि मला फोन आला की तुमची निवड झालीये. त्यावेळी मी खूप आनंदात होतो. पण, साधारण सप्टेंबर ते मार्च हे सात महिने मी घरीच बसून होतो. कारण सुबोध भावेकडे तारखा नव्हत्या. याच सात महिन्यांच्या काळात चिन्मयने लिखाण करण्यास सुरुवात केली. वादळवाटचे लेखक अभय परांजपे यांनी माझं ‘जोकर’ हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यावर त्यांनी या नाटकाचं लिखाण कोणी केलं विचारलं. त्यावर, आम्हीच इंप्रोवाइज केलंय. लिहीलं वगैरे नाहीये, असं सांगितलं. त्यावर, त्यांनी ‘तू लिहिलंय का?’ असं विचारलं, मी म्हटलं, ’90 टक्के मीच लिहिलंय’. त्यानंतर ते म्हणाले ‘तू लेखक आहेस. लिहायला सुरुवात का करत नाही?’ असं त्यांनी विचारलं.” अशा पद्धतीने चिन्मय यांच्या लिखाणाला खरी दिशा मिळाली आणि पुढे त्यांनी लिखाण सुरु केलं .
“म्हणून मला सहा-सात महिने घरी बसावं लागलं…”
“त्यावेळी सुबोध भावे कोण हे त्यावेळी मला माहित पण नव्हतं. सुबोध एकाच वेळी चार मालिका करत होता. ‘वादळवाट’ ‘जगावेगळी’ ‘या गोजिरवाण्या घरात’ ‘अवंतिका’ या त्याच्या चार मालिका होत्या, तसंच तो नाटक आणि सिनेमामध्येही व्यक्त असायचा. माझी निवड झाली आणि सुबोध भावेला मालिकेसाठी वेळ नसल्यानं मला सात महिने घरी राहावं लागलं.’ आणि सात महिन्यानंतर सुबोध आणि चिन्मय ही जोडी वादळवाट या गाजलेल्या मालिकेत झळकली होती. चिन्मयने सुबोध भावेंसोबतचा पहिला अनुभव होता याबद्दल सांगितला. मात्र आता हे दोघेही अगदी चांगले मित्र आहेत.