अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे.(Image source- X)
Published on
:
04 Feb 2025, 5:45 am
Updated on
:
04 Feb 2025, 5:45 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. २०५ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे एक लष्करी विमान सी-१७ सॅन अँटोनियोहून अमृतसरकडे रवाना झाले, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करत असलेल्या स्थलांतरितांवरील कारवाई तीव्र केली आहे. २०५ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे एक लष्करी विमान सी-१७ सॅन अँटोनियोहून अमृतसरकडे रवाना झाले. (illegal immigrants in US )
A US military plane is deporting migrants to India, a US official said, the farthest destination of the Trump administration's military transport flights for migrants https://t.co/H76fE3FrMR
— Reuters (@Reuters) February 4, 2025निवडणुकीत ट्रम्प यांनी दिले होते स्थलांतरितांच्या हद्दपारीचे आश्वासन
अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्प यांनी स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे आश्वासन दिले होते. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने सुमारे १८,००० बेकायदा वास्तव्य असलेल्या भारतीय नागरिकांची पहिली यादीही तयार केली आहे. 'प्यू रिसर्च सेंटर'च्या आकडेवारीनुसार, भारतातून सुमारे ७,२५,००० बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात, ज्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अमेरिकेत अनधिकृत स्थलांतरितांची लाेकसंख्या असणारा भारत तिसरा देश आहे.
भारतानेही स्पष्ट केली हाेती भूमिका
अमेरिकेतील बेकायदा वास्तव्य करणार्या भारतीयांबाबत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आमचे काही नागरिक तेथे बेकायदेशीरपणे असतील तर ते पुन्हा भारतात वास्तव्यास येवू शकतात. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय स्थलांतरितांना परत मायदेशी घेण्याबाबत योग्य निर्णय घेतील. कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्कराने विशेष विमान सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना नेले आहे.