गोऱ्या वर्णावरून नील नीतीन मुकेशला रोखलं होतं विमानतळावर, नेमकं काय घडलं? Instagram
Published on
:
04 Feb 2025, 7:25 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:25 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेता नील नीतीन मुकेशला गोऱ्या वर्णावरून न्यूयॉर्क विमानतळावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. ४ तास चौकशी झाल्याचेही त्याने अनेकवर्षानंतर खुलासा केला आहे. जेव्हा नीलने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याचे नाव गूगलवर सर्च करा, तेव्हा हे प्रकरण शांत झाले होते.
नील नीतीन मुकेश बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकताच नीलने अमेरिकेतील त्याच्या प्रवासाविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्क विमानतळावर त्याला रोखण्यात आले होते. ४ तास चौकशी देखील झाली. नीलने सांगितले की, भारतीय पासपोर्ट असतानाही इमिग्रेशन अधिकारी मान्य करत नव्हते की, तो भारतीय आहे.
एका मुलाखतीत नील नीतीन मुकेशने सांगितले की, ही घटना न्यूयॉर्क (२००९) च्या चित्रपटाच्या शूटिंग वेळची होती, त्याची कहाणी ९/११ घटनेवर आधारित होती. नीलने सांगितले की, ‘मला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. आणि हे मान्य करायला तयार नव्हते की, त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आणि तो भारतीय आहे. त्यांनी मला माझे मत मांडण्याचे किंवा उत्तर देण्यासाठी संधीदेखील दिली नाही.’
हवं तर गूगल करा - नील नीतीन मुकेश
नील नीतीन मुकेशने पुढे सांगितले की, ही एक सामान्य चौकशी सुरु झाली पण नंतर ४ तास चिंतेचे बनले. कारण अधिकारी त्याला सातत्याने प्रश्न विचारत राहिले. त्यांना आपली ओळख स्पष्ट करण्याची संधी देखील दिली नाही. तो म्हणाला, ‘चार तासानंतर अधिकारी परतबा आले आणि विचारलं की, तुला काय बोलायचंय? मी केवळ हे म्हणालो की, माझं नाव गूगल करा.’
न्यूयॉर्क विमानतळावर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली खंत
त्याने सांगितले की, ‘माझ्या या उत्तराने सर्वांना धक्का बसला आणि त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव झाली. त्यांचे संपूर्ण वागणे बदलले. त्यांनी माझे आजोबा, वडील आणि परिवाराविषयी विचारलं.