महांकाळेश्वर यात्रा सुरु, पहिल्या दिवशी 25 हजार भाविक दर्शनाला:सूर्योदयास निघाला छबिना, 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल यात्रा
2 hours ago
1
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्यातील सासुरे येथे श्री महांकाळेश्वर यात्रेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. परंपरेप्रमाणे यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजता टोपाचा छबिना निघाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे २० ते २५ हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ही यात्रा १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात्रेनिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री महांकाळेश्वर हे मूळ उज्जैन येथील देवस्थान आहे. परंतु, दयाळ राजे या अवतारी पुरूषाच्या भक्तीस पावन होऊन देव सासुरे येथे प्रकटले तेव्हापासून हा यात्रा उत्सव दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस साजरा झाला. शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी श्री महांकाळेश्वर सासुरे गावातील ज्या मुली माहेरवाशी आहेत त्या सासुरे गावात दिवाळी सणाला न येता यात्रेलाच येतात त्याच दिवशी आपली दिवाळी साजरी करतात . १७ रोजी सकाळी ह.भ.प. रामायनाचार्य राजन काशीद महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर रात्री छबीना निघणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी हभप काका काकडे महाराज यांची कीर्तन होणार आहे. रात्री छबीना निघणार आहे. मंगळवारी लळीत साजरी होणार असून रात्री टोपाच्या छबीन्याने यात्रेची सांगता होईल. यात्रेतील लेझीम स्पर्धेत ३० संघाचा सहभाग सासुरे येथील महांकाळेश्वर यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या लेझीम स्पर्धेत २५ ते ३० संघ सहभागी झाले आहे. याशिवाय यात्रेनिमित्त अनेक मनोरंजन ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात खेळणी , पाळणे मोठ्या प्रमाणात आले आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)