संगम नगरी प्रयागराज येथील अमृत स्नान आटोपल्यानंतर सर्व आखाड्यातील नागा साधूंनी महाकुंभातून निरोप घ्यायला सुरुवात केली आहे. आता केवळ सात आखाड्यातील नागा साधू शिल्लक राहीले आहेत. ते देखील १२ फेब्रुवारीला काशीसाठी रवाना होतील. परंतू महाकुंभला निरोप देण्यापूर्वी नागा साधू एक विधी करतात. या महाकुंभात आलेल्या नागासाधूंचा नंतर परतीचा प्रवास सुरु होतो. त्याआधी काही धार्मिक अनुष्ठान देखील नागा साधू करतात…
शेवटचा कुंभ कधी
शुक्रवारी महाकुंभचा २७ वा दिवस आहे. अजून १९ दिवसांचा कार्यक्रम शिल्लक आहे. २६ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. नागा साधूंचे तिन्ही स्नान संपले आहेत. त्यानंतर त्याची वापसी होणार आहे. गुरुवारीच अनेक आखाड्यांचे साधू निघाले. काही आखाड्यांचे साधू १२ फेब्रुवारी रोजी निरोप घेणार आहेत. तर काही आखाड्यांचे साधू वसंत पंचमीच्या स्नानानंतर निरोप घेतील. सात आखाड्यांचे साधू थेट आता काशी विश्वनाथला जातील. आधी प्रयागराज येथे सर्व नागासाधू निघण्यापूर्वी कढी – पकोडे यांचे भोजन ते करतात. आणि दुसरे म्हणजे शिबिरात लावलेली धर्म ध्वजाची रस्सी ढीली करतात. असे म्हटले जाते की ही त्यांची शतकाहून जुनी परंवरा आहे. नागा साधू यांच्या मते महाकुंभातून निरोप घेताना हा विधी केल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. त्यापैकी काही जण गुरुंकडे जातात, काही जण हिमालयात तपश्चर्या करायला रवाना होतात.
काशी विश्वनाथला जाणार नागा साधू
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सात आखाड्यांचे नागा साधू वाराणशीच्या काशी विश्वनाथला रवाना होतील, तेथे २६ तारखेच्या महाशिवरात्रपर्यंत आपला डेरा टाकतील त्यानंतर ते आपआपल्या आखाड्यात रवाना होतील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाराणसीत नागांची मिरवणूक निघेल. त्यानंतर मसान होळी साजरी केली जाईल आणि त्यानंतर गंगास्नान केले जाईल. ही तिन्ही कामं झाल्यानंतर ते माघारी फिरतील…
तिन्ही शाही स्नान सपंताच पुढचा प्रवास
साधूंसाठी अमृत स्नानाचे महत्व खूप आहे. अशी मान्यता आहे की अमृत स्नान केल्यानंतर एक हजार अश्वलमेथ यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते. महाकुंभमध्ये अमृत स्नान केल्यानंतर साधू संत ध्यानस्थ होतात. शेवटचे अमृत स्नान झाल्यानंतर सर्व साधू आपआपल्या आखाड्यांकडे परण्याचा प्रवास सुरु करतीत..