Published on
:
07 Feb 2025, 10:10 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रॅव्हलरने टँकरला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात ६ ठार तर १५ जखमी झाले. या अपघातात बेळगावचे ४ भाविक ठार झाल्याची माहिती आहे. उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन परततेवेळी हा अपघात आज (दि.७) पहाटे ३ वाजता मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील मानजवळ झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. (Belgaum Accident News)
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. याआधी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यात आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघेजण गणेशपूर येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. याच अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बेळगावातून एक मिनी बस करून उज्जैन सह प्रयागराज येथे हे भाविक प्रवासाला निघाले होते. अपघातात बळी गेलेल्या दोघांची नावे सागर आणि नीता अशी असल्याचे समजते. तर उर्वरित चार जणांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. बेळगावहून महाकुंभ मेळ्यासाठी १९ भाविक गेले होते.त्यातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.