महिला जपानुष्ठान सोहळ्याची पालखी मिरवणुकीने सांगता:मिरवणुकीत ७७७ किलो वजनाचा चांदीचा रथ

2 hours ago 1
निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामींच्या मातोश्री म्हाळसा माता व स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझर आश्रमात आयोजित महिला जपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, महायज्ञ, हस्तलिखित नामजप, ब्रह्ममुहूर्तावर अमृततुल्य नित्यनियम विधी, महाआरती, प्रवचन, सत्संग, प्रवचन, श्रमदान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सांगता पालखी मिरवणुकीने झाली. ओझर शहरात निघालेल्या पालखी मिरवणुकीत ७७७ किलो वजनाचा चांदीचा रथ, बाबाजींची पालखी पादुका रथ तसेच हजारो महिला साधक, कलशधारी महिला, कुमारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. महिला जपानुष्ठान सोहळ्याच्या सांगता प्रसंगी रविवारी ओझरमध्ये मिरवणूक निघाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article